पुणे: रामटेकडी येथे टोळक्याकडून २० ते २५ वाहनांची तोडफोड, कुटुंबावर हल्ला, जीवे मारण्याची धमकी

पुणे : शहरात वाहन तोडफोड आणि दहशत माजवण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे.  रिक्षा चालकाला आणि त्याच्या कुटुंबियांना धारधार शस्त्रं आणि दगडाने मारहाण करत टोळक्याने २० ते २५ वाहनांची तोडफोड केल्याची घटना धक्कादायक घडली.

रामवाडीत टोळक्याकडून २० ते २५ वाहनांची तोडफोड, कुटुंबावर हल्ला, जीवे मारण्याची धमकी

सहा आरोपींना ठोकल्या बेड्या 

पुणे : शहरात वाहन तोडफोड आणि दहशत माजवण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे.  रिक्षा चालकाला आणि त्याच्या कुटुंबियांना धारधार शस्त्रं आणि दगडाने मारहाण करत टोळक्याने २० ते २५ वाहनांची तोडफोड केल्याची घटना धक्कादायक घडली. ही घटना  रामटेकडी  येथील ठोंबरे वस्ती येथे रविवारी (दि. १०) मध्यरात्री साडे बाराच्या घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी ६ आरोपीना अटक केली आहे. (Ramwadi Crime News)

कपिल दत्तात्रय तांदळे (वय-३८, रा. ठोंबरे वस्ती, रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanowrie Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार लड्डू उर्फ साहिल वाघेला, टिल्ली उर्फ इरफान शेख, अजय विजय उकिरडे, बप्पी हेमंत दोडके, राहुल ताटे, अभिजित अशोक काकडे (सर्व रा. रामटेकडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी कपिल तांदळे हे रिक्षा चालक आहेत. ते काम संपवून घरी निघाले असता आरोपी अजय उकिरडे आणि त्याच्या सहकार्यांनी तांदळे यांना रामटेकडी येथील लक्ष्मीमाता मंदिराजवळ अडविले. यानंतर आरोपीं अजय आणि लड्डू याने फिर्यादी यांच्या रिक्षात असणारा मोबाईल हिसकावून घेतला. तर इरफान शेख राहुल यांनी शर्टच्या खिशातील ३०० रुपये जबरदस्तीने काढून घेत असतांना फिर्यादी यांनी प्रतिकार केला. याचा राग आल्याने आरोपी लड्डूने फिर्यादी यांच्या तोंडावर मारत जखमी केले. तर इतर आरोपींनी हातात दगड घेऊन ते रिक्षावर फेकले. यानंतर फिर्यादी हे रिक्षा घेऊन तुमची तक्रार पोलीस ठाण्यात देणार असे सांगून निघाले. याचा आरोपीना राग आल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या ७ ते आठ दुचाकी ढकलून दिल्या आणि चार चाकी गाड्यांच्या काचेवर दगड, विटा, पेव्हर ब्लॉक फरशांचे तुकडे मारून नुकसान केले. यानंतर फिर्यादी हे घरी गेले असता आरोपी उकिरडे, लड्डू, अभिजित काकडे आणि इतर त्यांच्या मागे गेले आणि त्यांना मारहाण करू लागले. हे पाहून फिर्यादी यांच्या कुटुंबातील सदस्य हे भांडणे सोडवण्यासाठी खाली  आले. आरोपींची त्यांना सुद्धा धारधार शस्त्र, दगड, विट्टाणी मारहाण केली. यात फिर्यादी त्यांचा भाऊ किरण, अभिषेक, मुलगा हर्षवर्धन जखमी झाला. यानंतर आरोपीने परिसरात दहशत माजवत आम्ही या वस्तीतले भाऊ आहोत, आमचे नादाला कोणी लागायचे नाही, कोणी मध्ये आले तर त्याची विकेट पाडू असे धमकी दिली. आरडा ओरडा करून परिसरात पार्क केलेल्या ६ रिक्षा, ७ ते ८ दुचाकी, ४ ते ५ मोटारीसह २० ते २५ वाहनांची तोडफोड करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारानंतर तांदळे यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. (Pune Crime News )

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest