पुणे: भूमकर चौकात पहाटे अडीचच्या सुमारास गोळीबार; माचिस मागितल्याच्या कारणातून घडली घटना!

पुणे : सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भूमकर चौकात एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. ही घटना गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत तरुणाच्या खांद्याला गोळी लागल्याचे समजते.

संग्रहित छायाचित्र

पुणे : सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भूमकर चौकात एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. ही घटना गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत तरुणाच्या खांद्याला गोळी लागल्याचे समजते. (pune crime news)

गणेश गायडवाड (रा. वारजे) असे जखमी तरुणाचे नाव आहे.   त्याच्या खांद्याला गोळी लागली आहे. माचिस मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादामधून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. दरम्यान शहरात गोळीबाराच्या सलग तीन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. जंगली महाराज रस्त्यावर एका रियल इस्टेट व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला. तर, दुसरी घटना हडपसरमध्ये घडली. दोन सेक्युरिटी एजन्सीमधील व्यावसायिक वादातून एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकावर पिस्तूलातून गोळ्या झाडल्या.  (firing at bhumkar chowk)

पोलीस आयुक्तालयात पिस्तुल, बंदूक बाळगणे आणि तत्सम गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची परेड घेण्यात आली होती. त्यानंतर, देखील सलग घटना घडू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest