दुचाकी चोरट्याला चंदननगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुणे: विश्रांतवाडी , चंदननगर व हडपसर परीसरातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला चंदननगर पोलिसांनी (Chandannagar Police) बेड्या ठोकल्या. चोरट्याकडून १ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या एकूण ०७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. (Pune Police News)
तुकाराम ईश्वर आव्हाळे (वय २२, रा.जकात नाका, पुणे नगर रोड,खराडी, मुळ पत्ता मु.पो. राचन्नावाडी ता. चाकुर जि.लातुर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्यावर या गुन्ह्यासह इतर आणखी चार गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. बळीराम संजय बेळगे (वय २७, रा. आपले घर लेन नं.०५, खराडी) यांनी दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद चंदननगर पोलीस ठाण्यात दिली होती. फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा तपास करताना गस्तीवर असलेल्या पोलीसांनी या आव्हाळे या चोरट्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आव्हाळे हा एका खासगी हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. दाखल गुन्ह्याचा तपास करते वेळी गस्तीवरील पोलिसांना एक व्यक्ती चोरीची दुचाकी खराडीतील शेल पेट्रोलपंप येथे थांबला असल्याचे माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी जावून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करून त्याच्या ताब्यातील दुचाकी ताब्यात घेण्यात आली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आणखी ६ दुचाकी चोरल्याची कबूली दिली, त्याप्रमाणे त्याच्याकडून त्याही दुचाकी जप्त केल्या. त्याच्यावर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात १, चंदननगर पोलीस ठाण्यात ०२ गुन्हे आणि इतर तीन गुन्हे आरोपीवर दाखल आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष घोडके करीत आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.