संग्रहित छायाचित्र
रेणूका पवार
Pune crime : पुण्यातून एक धक्कादायक प्रकारक समोर आला आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी एका तरुणाने दिली आहे. या प्रकरणी तरुणाला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली असून वैभव तुकाराम कर्णिक (वय २०) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत तरुणीने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तक्रारदार तरुणी कात्रज भागातील दत्तनगर परिसरात राहायला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा तरुण तिला त्रास देत होता. माझे तुझ्यावर प्रेम आहे, असं सतत म्हणत होता. तरुणीने त्याला नकार दिल्याने कर्णिक याने तिला चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी दिली. तरुण तिचा बरेच दिवसांपासून पाठलाग देखील करत होता. घाबरलेल्या तरुणीने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.