Pune Crime News: नवीन वर्षांच्या पहिल्याच रात्री कामगार सोने घेऊन पसार; पोलिसांकडून शोध सुरू

पुणे : नवीन वर्षाच्या स्वागताची सगळीकडे तयारी सुरू असतानाच एका सराफी व्यावसायिकाला त्याच्या कामगाराने हिसका देत तब्बल ३ कोटी ३२ लाख ९ हजार २२८ रुपयांचे ५ किलो ३२३ ग्राम सोन्याचे दागिने

Pune Crime News: नवीन वर्षांच्या पहिल्याच रात्री कामगार सोने घेऊन पसार; पोलिसांकडून शोध सुरू

फरासखाना पोलिसांकडून शोध सुरू

पुणे : नवीन वर्षाच्या स्वागताची सगळीकडे तयारी सुरू असतानाच एका सराफी व्यावसायिकाला त्याच्या कामगाराने हिसका देत तब्बल ३ कोटी ३२ लाख ९ हजार २२८ रुपयांचे ५ किलो ३२३ ग्राम सोन्याचे दागिने आणि १० लाख ९३ हजार २६० रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना १ जानेवारी रोजी पहाटे तीन वाजता रविवार पेठेतील (Ravivar Peth) राज कास्टिंग या दुकानात घडली. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (Pune crime news)

याप्रकरणी दीपक नेताजी माने यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने यांचा सराफी व्यवसाय आहे. त्यांचा धायरी येथे सोन्याचे दागिने घडविण्याचा कारखाना आहे. याठिकाणी दागिने घडवून ते रविवार पेठेतील दुकानात तिजोरीत ठेवत असतात. ते शहरातील विविध सराफी व्यावसायिकांनी दिलेल्या ऑर्डर नुसार दागिने देखील तयार करून देतात. पुण्यामध्ये मागील सात वर्षांपासून त्यांचा व्यवसाय सुरू आहे. त्यांच्याकडे आजवर अनेक कामागारांनी काम केले आहे. सध्या त्यांच्याकडे चार कामगार काम करतात. 

सध्या काम करीत असलेल्या किंवा यापूर्वी काम केलेल्या कामागारांपैकी कोणीतरी त्यांच्या दुकानाची आणि तिजोरीची बनावट चावी तयार करवून घेतली. त्याचा वापर करून दरवाजा उघडला. दुकानातील तिजोरी बनावट चावीच्या सहाय्याने उघडून ३ कोटी ३२ लाख ९ हजार २२८ रुपयांचे ५ किलो ३२३ ग्रॅम दागिने आणि १० लाख ९३ हजार २६० रुपयांची रोकड चोरून नेली. सकाळी दुकान उघडण्याकरिता आलेल्या माने यांना तिजोरीमधील दागिने गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक वैभव गायकवाड करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest