Pune Crime News: चारित्र्याचा संशय... पत्नीच्या डोक्यात घातले कुऱ्हाडीचे घाव

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत तिचा निर्घून खून केला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास वारजे येथील संभा कॉलनीमध्ये (Sambha Colony) घडली.

Pune News

संग्रहित छायाचित्र

वारजे येथील संभा कॉलनीमध्ये घडली निर्घून घटना

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत तिचा निर्घून खून केला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास वारजे येथील संभा कॉलनीमध्ये (Sambha Colony) घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. (Pune Crime News)

उमा ऊर्फ पूजा लखन कांबळे (वय २५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती लखन कांबळे (वय २८) याला ताब्यात घेण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी दिलेल्या माहिती नुसार,  कांबळे दाम्पत्य मूळचे धाराशीव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील राहणारे आहे. कामाच्या निमित्ताने पुण्यात आलेले हे दाम्पत्य मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. परंतु, सध्या लखन काहीच करीत नव्हता. आरोपी लखन याला उमाच्या चारित्र्यावर संशय होता. यावरून त्यांच्यामध्ये वाद होत होते. मंगळवारी सकाळी देखील त्यांच्यामध्ये यावरून वाद झाले होते. 

त्याने रागाच्या भरात कुऱ्हाड घेऊन तिच्यावर वार करायला सुरुवात केली. कुऱ्हाडीचे घाव वर्मी बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पोलिसांना स्थानिकांनी माहिती कळवली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवून दिला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest