PUNE CRIME NEWS: पोलीस उपनिरीक्षकावर बलात्कार-अट्रोसिटीचा गुन्हा

पुणे : मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकावर बलात्कार आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अन्याय प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल

Pune Police

संग्रहित छायाचित्र

पुणे : मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकावर बलात्कार आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अन्याय प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका दलित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिला लॉजवर नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. तसेच, तिला जातीवरून अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार १० जुलै २०२३ ते ४ डिसेंबर २०२३ या कालावधी दरम्यान नंदनवन लॉज या ठिकाणी घडला. (Pune Crime News)

युवराज वामन शिंदे आणि त्यांची पत्नी काजल युवराज शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. युवराज शिंदे हे मार्केट यार्ड पोलीस ठाण्यामध्ये उपनिरीक्षक म्हणून नेमणुकीस आहेत. याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला बाणेर येथे राहण्यास आहे. तिची आणि उपनिरीक्षक शिंदे यांची ओळख झाली होती. त्या ओळखीतूनच पुढे शिंदे यांनी या महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. तिचा विश्वास संपादन केला गोड बोलून तिला नेहमी महागड्या वस्तू देण्यास भाग पाडले. 

तिला वेळोवेळी सातारा रोड येथील नंदनवन लॉज मध्ये घेऊन जाऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कालांतराने त्याने तिच्यासोबत संपर्क ठेवण्यास आणि बोलण्यास टाळाटाळ सुरू केली. याबाबत तिने त्याच्याकडे जाब विचारला असता शिंदे यांची पत्नीने त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तिच्या जातीचा उल्लेख करून तो टाकून दिलेल्या जातीची आहेस असे बोलून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अंगावर धावून जात झटापट केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा तपासासाठी स्वारगेट पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास स्वारगेट विभागाचे सहाय्य पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest