PUNE CRIME NEWS: पोटच्या मुलीवरच केले कुऱ्हाडीने वार

पुणे : कौटुंबिक वादामधून पोटच्या अल्पवयीन मुलीवर कुऱ्हाडीने वार करीत वडिलांनी प्राणघातक हल्ला केला. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वाघोली (Wagholi) येथील

Pune Crime

संग्रहित छायाचित्र

हल्लेखोर बापाला लोणीकंद पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे : कौटुंबिक वादामधून पोटच्या अल्पवयीन मुलीवर कुऱ्हाडीने वार करीत वडिलांनी प्राणघातक हल्ला केला. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वाघोली (Wagholi) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. (Pune Crime News)

अक्षदा फकिरा दुपारगुडे (वय १५, रा. वाघोली) असे हल्ला झालेल्या मुलीचे नाव आहे. तिचा वडील फकिरा दुपारगुडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फकिरा हा बांधकाम साईट्सवर सेंटरिंग लेबर म्हणून काम करतो. तर त्याची मुलगी अक्षदा ही इयत्ता दहावीत शिकते. तिची आई धुण्याभांडयाची कामे करते. हे कुटूंब मुळचे धाराशीव जिल्ह्यातील आहे. हे सर्वजण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळच राहण्यास आहे. बुधवारी सकाळी घरामध्ये अक्षदा आणि तिचे वडील असे दोघेच होते. तिची आई धुण्याभांड्यांच्या कामासाठी गेलेली होती.

यावेळी दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू झाले. चिडलेल्या आरोपीने काही कळायच्या आतच तिच्यावर कुऱ्हाडीने वार करायला सुरुवात केली. तिच्या डोक्यावर, हातावर व पायावर आरोपीने वार केले. तिचा आरडाओरडा ऐकून आसपासचे लोक मदतीला धावले. या घटनेची पोलिसांना तात्काळ माहिती कळवण्यात आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत जखमी मुलीला रुग्णालयात हलवले. हा हल्ला कशासाठी करण्यात आला याबाबत तपास सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वनाथ काईंगडे यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest