Pune Crime News : अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार

आपल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मेहुणीवर वारंवार बलात्कार करून आईला मारून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Thu, 26 Oct 2023
  • 09:36 pm
Pune Crime News : अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार

अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार

पुणे : आपल्या सोळा वर्षीय अल्पवयीन (Crime News) मेहुणीवर वारंवार बलात्कार करून आईला मारून टाकण्याची धमकी (Pune Police) दिल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार २०२१ पासून आज पर्यंत घडला. (Pune News) याप्रकरणी १६ वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे.

आरोपी हा पीडित मुलीचा दाजी आहे. त्याने पीडित मुलगी घरामध्ये एकटी असताना गैरफायदा घेत तिचे तोंड दाबून चार वेळा बलात्कार केला.. कोणाला काही सांगितले तर तिला पुन्हा बलात्कार करण्याची आणि तुझ्या आईला मारून टाकीन अशी धमकी दिली. त्याने बलात्कार करीत असतानाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले. तसेच, ही पीडित मुलगी कुठेही जात असताना वारंवार तिचा पाठलाग करून तिला मारहाण केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest