Pune Crime News: मॅफेनटरमाइन सल्फेटची बेकायदा विक्री

पुणे : हडपसर, माळवाडी परिसरात बेकायदेशिरपणे मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन ) इंन्जेक्शनची विक्री करणाऱ्यास हडपसर तपास पथकाकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून

आरोपी किरण शिंदे

तरुणाला अटक: तब्बल ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे : हडपसर, माळवाडी परिसरात बेकायदेशिरपणे मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन ) इंन्जेक्शनची विक्री करणाऱ्यास हडपसर तपास पथकाकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन ) इंन्जेक्शनच्या ३० बाटल्या व एक मोटारसायकल असा ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

किरण विठ्ठल शिंदे (वय २१, नऱ्हे) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भादवि कलम ३२८,२७३,२७६,३३६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अतुल पंधरकर यांनी फिर्याद दिली आहे. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अल्पवयीन असताना त्याच्यावर खुनाचा गुन्हा देखील दाखल झालेला होता. पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांना खबऱ्याने आरोपी शिंदे हा हडपसर परिसरातील माळवाडी येथे मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन ) इंन्जेक्शनची विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली होती. 

त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे आणि अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अजित मदने, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव यांच्या पथकाने आरोपीच्या शोधासाठी सापळा रचला. पोलीस पथकाने अन्न व औषध निरीक्षक श्रुतीका जाधव यांची मदत घेतली. त्यांना सोबत घेऊनच पोलिसांचे पथक रवाना झाले. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्याला पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील पिशवीत मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मीन ) इंन्जेक्शनच्या ३० बाटल्या मिळून आल्या. त्याने 'या औषधापासून  नशा केली जाते. तो हे इंजेक्शन ५५० रुपयांना एक याप्रमाणे विकत असल्याची माहिती पोलिसांना दिली. 

त्याच्याकडे कोणताही औषध विक्री परवाना नाही. तसेच, औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतलेले नाही. नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने अनाधिकाराने बेकायदेशीररित्या हे औषध विक्रीकरिता स्वत:च्या ताब्यात घेऊन त्याची बेकायदा विक्री केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest