Pune Crime News: टेलिग्रामद्वारे लाखोंची फसवणूक

पुणे : टेलिग्राम अ‍ॅपद्वारे संपर्क करून टास्क जॉब देऊन परताव्याचे आमिष दाखवीत दोन घटनांमध्ये १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी लोणीकंद आणि चतु:शृंगी पोलीस

Task Fraud

संग्रहित छायाचित्र

दोन वेगवेगळे गुन्हे दाखल; दोन घटनांमध्ये बारा लाखांचा गंडा

पुणे : टेलिग्राम अ‍ॅपद्वारे संपर्क करून टास्क जॉब देऊन परताव्याचे आमिष दाखवीत दोन घटनांमध्ये १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी लोणीकंद आणि चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Pune Crime News)

लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये (Lonikand Police Station) सोनाली प्रदीप रणनवरे (वय ३५, रा. वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांना अज्ञात आरोपींकडून  मोबाईलवरून संपर्क साधण्यात आला. त्यानंतर टेलिग्रामद्वारे देखील संपर्क साधण्यात आला. त्यांना विविध प्रकारचे टास्कचे काम केल्यानंतर पैसे मिळतील असे सांगण्यात आले. त्यांना विविध टास्क देण्यात आले. सुरुवातीला त्यांना थोडा मोबदला देण्यात आला. त्यांचा विश्वास संपादन करून विविध चार्जेस आणि गुंतवणूक अशा स्वरूपात चार लाख ४४ हजार ६७० रुपये घेऊन त्यांची  आर्थिक फसवणूक करण्यात आली.

तर, चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chatushrungi Police Station) शिवकुमार अण्णाप्पा बामनकर (वय ४४, रा. पाषाण-सुस रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांना अज्ञात आरोपींनी टेलिग्राम तसेच व्हाट्सअप वरून संपर्क साधला. त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना पार्टटाइम नोकरी आणि त्या माध्यमातून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यांना ऑनलाईन टास्कचे काम देण्यात आले. हे काम पूर्ण केल्यास चांगला परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यांना प्रीपेड टास्करिता ७ लाख ९२ हजार ३४  रुपये भरायला लावण्यात आले. परंतु, त्यांना कोणताही परतावा तसेच मूळ रक्कम न देता आर्थिक फसवणूक करण्यात आली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest