पुणे : लष्कराच्या दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्स आणि पुणे पोलिस यांनी संयुक्त कारवाई (Pune Crime News) करीत लष्कर परिसरातून मेफेड्रोन या अमली (Pune News) पदार्थांची तस्करी उघड केली आहे. ही तस्करी करणाऱ्या (Pune Police) चौघा जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी लष्कर पोल खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून दोन लाख १४ हजार रुपयांचे मेफेड्रोन आणि एक लाख दहा हजार रुपयांचे चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
ऋणीत बिपिन खाडे (वय १९, रा. अरविंद कॉम्प्लेक्स, सिंहगड रोड, हिंगणे), चैतन्य शिवाजी सावले (वय २७, रा. कमल प्रीत लीप सोसायटी, किरकटवाडी), सार्थ वीरेंद्र खरे (वय १९, रा. शिवसागर सिटी, सनसिटी रोड, आनंदनगर, सिंहगड रोड), विशाल कमलेश मेहता (वय १९, रा. वरवडे वस्ती, सिंहगड रोड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार अनुष जोतिबा माने (रा. घोरपडे पेठ) हा फरार झाला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लक्ष्मण घोरपडे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याची माहिती लष्कराच्या दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्सला मिळाली होती. त्यानुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची मदत घेण्यात आली. गुन्हे शाखा आणि दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्सच्या संयुक्त पथकाने शुक्रवार पेठेतील स्नेहदीप बंगल्यासमोर असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर सापळा लावला. या ठिकाणी आलेल्या आरोपींना संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी करून झडती घेण्यात आली. त्यामध्ये मेफेड्रोन आढळून आले. त्यांचे चारही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.