Pune Crime News: मध्यरात्री मुलीची घरात घुसून काढली छेड

पुणे : मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुलीच्या घरी जाऊन तिला धमकावत रिलेशनमध्ये राहण्याची सक्ती करीत तिला मारहाण करणाऱ्या आरोपीच्या सहकारनगर पोलिसांनी (Sahkarnagar Police) मुसक्या आवळल्या.

Pune Crime News

Pune Crime News: मध्यरात्री मुलीची घरात घुसून काढली छेड

सहकार नगर पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

पुणे : मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुलीच्या घरी जाऊन तिला धमकावत रिलेशनमध्ये राहण्याची सक्ती करीत तिला मारहाण करणाऱ्या आरोपीच्या सहकारनगर पोलिसांनी (Sahkarnagar Police) मुसक्या आवळल्या. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून कोयता देखील जप्त करण्यात आला आहे. ही घटना धनकवडी येथील बालाजीनगरमध्ये असलेल्या गुलमोहोर अपार्टमेंटमध्ये घडली होती. (Pune Crime News)

आशीष उर्फ पंप्या श्रीकृष्ण राख (वय १९, रा. दत्त कृपा सोसायटी, खुशबु हॉटेल मागे, बालाजीनगर, धनकवडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका पिडीत मुलीने फिर्याद दिली होती. आरोपीने मध्यरात्री या मुलीच्या घरी जाऊन तिच्या घराचे दार वाजवले. तिचा हात पकडून 'तु मला आवडतेस. तु माझ्या सोबत रिलेशन मध्ये रहा.' अशी धमकी त्याने दिली. तिने हात सोडविण्याचा प्रयत्न करून आरडाओरडा केला. त्यावेळी त्याने तिला मारहाण केली. २७ डिसेंबर रोजी तिला पुन्हा रस्त्यात अडवित 'तु माझ्या सोबत रिलेशनमध्ये राहणार का नाही?' अशी विचारणा केली. तिने नकार देताच 'तुला व तुझा घरच्यांना बघुन घेतो' अशी धमकी देत तिचा विनयभंग केला.

आरोपी हा बालाजीनगर येथे पंप्या उर्फ आशीष हा कोयता घेऊन राज लॉन्ड्रीचे पुढील रस्त्यावर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल पवार व निलेश शिवतरे यांना खबऱ्यामार्फत मिळाली. त्याला पोलिसांच्या पथकाकडून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झडतीमध्ये कंबरेला एक लोखंडी कोयता मिळून आला. त्याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे अशा प्रकारचे एकुण दोन गुन्हे बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहायक फौजदार बापु खुटवड, पोलीस अंगलदार अमोल पवार, निलेश शिवतारे,  बजरंग पवार, सुशांत फरांदे, भुजंग इंगळे, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, विशाल वाघ, सागर कुंभार, सागर सुतकर यांनी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest