Pune Crime News: दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांकडून ६ दुचाकी केल्या जप्त

पुणे: शहरात दुचाकी वाहनांचे चोरीला आळा बसावा यासाठी मोहिम राबवुन कारवाई करण्यात येत आहे. याच मोहिमे दरम्यान दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडील ६ दुचाकी पोलिसांनी जप्त

Pune Crime News: दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांकडून ६ दुचाकी केल्या जप्त

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखेची कामगिरी

पुणे: शहरात दुचाकी वाहनांचे चोरीला आळा बसावा यासाठी मोहिम राबवुन कारवाई करण्यात येत आहे. याच मोहिमे दरम्यान दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडील ६ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.  (Pune Police)

कार्तिक दत्तात्रय दळवी (वय २०, रा. मु.पो. पौड, ता.मुळशी), दिगंबर ऊर्फ दिनु अंकुश आहे (वय २६, रा. पौड पोलीस स्टेशनजवळ पौड  मुळपत्ता- चाळ नं बी ११३ ,अप्पर इंदीरानगर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या १ लाख ४० हजाराच्या ६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.  (Pune Crime News)

कोथरुड पोलीस ठाण्यातील (Kothrud Police Station) दाखल गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, महेश पाटील आणि श्रीकांत दगडे यांना त्यांच्या बातमीदाराने बातमी दिली होती की, दाखल गुन्ह्यातील दुचाकी चोरी करणारे दोन आरोपी हे वारजे पुलाजवळील चर्चजवळ थांबले आहेत. त्यांच्याजवळ एक काळया, राखाडी रंगाची दुचाकी असून ही दुचाकी चोरीची आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून वरील दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे मोटार सायकलीचे कागदपत्रांबाबत चौकशी केली असता, उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली. दुचाकीचे कागदपत्र न दाखविल्याने त्या गाडीचे चासिस नंबर व इंजिन नंबरवरुन माहिती काढण्यात आली. ती गाडीबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी आणखी काही दुचाकी चोरल्याचे सांगितले.

त्यांच्यावर  कोथरुड पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून कोथरुड, फरासखाना, खडक, हवेली पोलीस ठाण्यातील तसेच अहमदनगरमधील कॅम्प पोलीस ठाण्यातील ६ गुन्हे उघडकीस आले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest