Pune Crime News: सावत्र वडिलांकडून दहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

पुणे : सावत्र वडिलांनी दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) गुन्हा दाखल करण्यात असून

संग्रहित छायाचित्र

पीडित मुलीच्या आईने दिली फिर्याद

पुणे : सावत्र वडिलांनी दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) गुन्हा दाखल करण्यात असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार रविवार, ७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी दीड वाजता घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे दोघे पती-पत्नी आहेत. आरोपी हा तिचा दुसरा नवरा आहे. या महिलेला पहिल्या पतीपासून दहा वर्षांची मुलगी आहे. ही मुलगी घरामध्ये एकटी असताना सावत्र वडिलांनी तिच्यासमोर स्वतःच्या पॅन्टची चेन उघडी ठेवली.

त्यानंतर तिच्यासमोर नग्न होऊन तिला त्या पॅन्टची चेन लावायला सांगितली. त्यासोबतच त्याने तिचे आणि स्वतःचे कपडे काढून तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. मुलीने या प्रकाराला विरोध केला असता तिला मारहाण करण्यात आल्याचे देखील फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल तिने आईला सांगितले. आईने या मुलीला घेऊन तात्काळ पोलीस ठाणे गाठले. पुढील तपास पर्वती पोलीस करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest