Pune Crime : पार्ट टाईम नोकरीच्या आमिषाने महिलेला घातला पावणेपाच लाखाचा गंडा

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे दरम्यान सायबर गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. सायबर क्राईममुळे लोकांची फसवणूक करून लाखो- करोडो रुपयांचा गंडा लावला जातो. असाच एक प्रकार शहरातील डेक्कन भागात घडला आहे.

Pune Crime

संग्रहित छायाचित्र

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे दरम्यान सायबर गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. सायबर क्राईममुळे लोकांची फसवणूक करून लाखो- करोडो रुपयांचा गंडा लावला जातो. असाच एक प्रकार शहरातील डेक्कन भागात घडला आहे. एका अज्ञात मोबाईलधारकाने ४८ वर्षीय महिलेला पार्ट टाईम नोकरीचे आणि वर्कफ्रोमहोमचे आमिश दाखवत विश्वास संपादन करत टास्क पुर्ण करण्यास भाग पाडत तब्बल पावणेपाच लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News) 

याप्रकरणी ४८ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस (Deccan Police) ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात मोबाईल धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ०८ डिसेंबर २०२३ ते १२ डिसेंबर २०२३ या कालावधीत ऑनलाईन माध्यमाद्वारे पीडित महिलेच्या राहत्या घरी डेक्कन येथे घडला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्याने पीडित महिलेला टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क केला आणि पार्ट टाईम नोकरी व वर्कफ्रोमची ऑफर दिली. त्यानंतर दिलेला टास्क पुर्ण केल्यानंतर परतावा मिळेल तसेच त्याकरीता वेगवेगळे चार्जेस भरावे लागतील असे सांगत पीडित महिलेचा सायबर चोरट्याने विश्वास संपादन करून महिलेची ४ लाख ४६ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार पीडित महिलेच्या राहत्या घरी डेक्कन येथे ०८ डिसेंबर २०२३ ते १२ डिसेंबर २०२३ या कालावधीत ऑनलाईन माध्यमाद्वारे घडला. पुढील तपास पोलीस करत आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest