Pune Crime : मुकबधिर महिलेचा विनयभंग; संस्थेच्या पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल

कर्वेनगर येथील मुकबधीर व्यक्तींच्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या एका मुकबधिर महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिला पोर्न व्हिडिओ दाखवून विनयभंग (molestation) करण्यात आला.

Pune Crime

मुकबधिर महिलेचा विनयभंग; संस्थेच्या पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल

पुणे : कर्वेनगर येथील मुकबधीर व्यक्तींच्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या एका मुकबधिर महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिला पोर्न व्हिडिओ दाखवून विनयभंग (molestation) करण्यात आला. हा प्रकार १३ जानेवारी ते १८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत किरकटवाडी, कर्वेनगर याठिकाणी घडला. वारजे पोलिसांनी (Warje Police) या प्रकरणी संस्थेच्या पर्यवेक्षकावर (सुपरवायजर) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News) 

अजय संपत काळे (संतोष नगर, कात्रज) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर ३५४, ३५४अ/१/एफ ४५२, ५०६, अपंग व्यक्तींचा अधिकार अधिनियम ९२ ड, आयटी एक्ट ६७ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २४ वर्षीय मुकबधिर महिलेने फिर्याद दिली आहे. वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काळे हा एका संस्थेमध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करतो. तर, पिडीत महिला तेथे नोकरी करीत होती.  फिर्यादी महिलेला बोलता आणि ऐकू येत नाही. आरोपीने या महिलेसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच मागे मागे जाऊन तिचा वारंवार पाठलाग देखील केला. तिचा मोबाईल क्रमांक मिळवत 'आय लव्ह यू' असे मेसेज पाठवले. अनेकदा अश्लील व्हिडीओ पाठविले. या महिलेच्या घरी जाऊन 'माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु माझ्याशी बोल' असे म्हणत त्यांना अश्लील स्पर्श केले. २२ जून रोजी ऑफिसमधील अन्य लोकांना बाहेर जाण्यास सांगत एकटीलाच ऑफिसमध्ये थांबवून घेतले. तिच्या पाठीवरून हात फिरवत विनयभंग केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest