Pune: जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल; श्रीरामांबद्दल केले होते वादग्रस्त वक्तव्य

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या श्रीरामांवरील वादग्रस्त विधानाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे

Pune: जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल; श्रीरामांबद्दल केले होते वादग्रस्त वक्तव्य

प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या श्रीरामांवरील वादग्रस्त विधानाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे (Dhiraj Ghate) यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ अ तक्रार दिली असून, विश्रामबाग पोलीस (Vishrambag Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोबत गुन्हा दाखल केल्याची प्रत जोडलेली आहे

मी श्री. धिरज रामचंद्र घाटे, वय 49 वर्षे, व्यवसाय समाजसेवा, रा. 7 / 297-98, सानेगुरुजी नगर, निलायम टॉकिज पाठीमागे, पुणे 411030

समक्ष विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे शहर येथे हजर राहून जबाब देतो की, मी वर नमूद पत्त्यावर माझ्या कुटुंबीयांसह जन्मापासून राहण्यास आहे. मी मागील 30 वर्षांपासून भारतीय जनता पार्टी या पक्षाचा कार्यकर्ता असून सध्या मी भारतीय जनता पार्टी पुणे शहर अध्यक्ष म्हणून कामकाज पाहात आहे.

दिनांक 03/01/2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास मी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नामे राघवेंद्र दिपक मानकर यांच्या निंबाळकर तालिम चौक, सदाशिव पेठ, पुणे येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये एबीपी माझा या चॅनलवर बातम्यांचे लाईव्ह टेलिकास्ट बघत असताना श्री. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या शिर्डी येथील राज्यस्तरीय शिबीराच्या व्यासपिठावरुन पक्षाच्या कार्यकत्यांशी संवाद साधताना " प्रभू श्रीरामचंद्र हे 14 वर्षे वनवास भोगत असताना मांसाहार करत होते. तसेच प्रभू श्रीरामचंद्र हे बहुजनांचा राम शिकार करुन खाणारा राम, राम हा शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता ", अशी आणि यासारखी समाजामध्ये तणाव निर्माण करणारी प्रक्षोभक वक्तव्य पक्षाच्या अधिकृत व्यासपिठावरुन करत असल्याचे मी पाहिले.

श्री. जितेंद्र आव्हाड यांनी केलेली प्रक्षोभक वक्तव्ये ही त्यांच्या पक्षाच्या अधिकृत व्यासपिठावरुन त्यांच्या पक्षाच्या कार्यकत्र्यांशी संवाद साधताना केलेली असून येत्या 22 जानेवारीला अर्योध्या येथे श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमिवर देशाचा धार्मिक सलोखा, अखंडता बाधित करण्याकरीता त्यांनी हिन्दू धर्मियांचे श्रद्धास्थान असणा - या प्रभू श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करुन जनतेच्या धार्मिक भावना दुखवल्यामुळे मी तक्रार देण्यासाठी आज रोजी पोलीस ठाणेस आलो.

तरी आमदार श्री. जितेंद्र आव्हाड यांनी दिनांक 03/01/2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या शिर्डी येथील राज्यस्तरीय शिबीराच्या व्यासपिठावरुन कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हिन्दू धर्मियांचे श्रद्धास्थान असणा - या प्रभू श्रीरामाबद्दल " प्रभू श्रीरामचंद्र हे 14 वर्षे वनवास भोगत असताना मांसाहार करत होते. तसेच प्रभू श्रीरामचंद्र हे बहुजनांचा राम शिकार करुन खाणारा राम, राम हा शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता ", अशी आक्षेपार्ह व प्रक्षोभक वक्तव्य करून जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्या, म्हणून माझी त्यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार आहे.

माझा वरील जबाब मी सांगितल्याप्रमाणे संगणकावर टंकलिखीत केला असून तो मी वाचून पाहिला

असता माझ्या सांगणेप्रमाणे बरोबर व खरा आहे.

प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्यामुळे मोठे वादंग पेटले होते. पुण्यात त्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा भाजपकडून काढण्यात आली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest