पुणे: कोथरूडच्या ‘लोढा पेट्रोल पंपा’वर स्फोट; मोठा आवाज झाल्यानंतर नागरिकांची एकच धावाधाव

पुणे : शहरातील पेट्रोल पंपावरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कोथरूड येथील महर्षी कर्वे पुतळा चौकात असलेल्या ‘लोढा पेट्रोल पंपा’वर मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास स्फोट झाला. त्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

कोथरूडच्या ‘लोढा पेट्रोल पंपा’वर स्फोट; मोठा आवाज झाल्यानंतर नागरिकांची एकच धावाधाव 

पुणे : शहरातील पेट्रोल पंपावरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कोथरूड येथील महर्षी कर्वे पुतळा चौकात असलेल्या ‘लोढा पेट्रोल पंपा’वर (Lodha Petrol Pump ) मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास स्फोट झाला. त्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पंपावरील नागरिक आणि वाहन चालकांची एकच पळापळ झाली. पंपावरच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती हतळल्याने दुर्घटना टळली. दरम्यान, अग्निशामक दलाचे जवान आणि कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

कर्वे पुतळा चौकात हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप आहे. या पंपावर एक टँकर पेट्रोलची डिलिव्हरी करण्यासाठी आला होता. हा टँकर पंपावर उभा होता. त्यावेळी भूमिगत पेट्रोलच्या टाकीवरील झाकण जोरात उडाले. हे झाकण उडत असताना मोठा फटाका फुटावा तसा जोरात आवाज झाला. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. स्फोट झाल्याची अफवा क्षणार्धात पसरली. पेट्रोलच्या भूमिगत टाकीमध्ये वायू तयार होऊन त्याचा दाब वाढल्याने हे झाकण उडाळ्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. दरम्यान, पंपावरील कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवीत तात्काळ पेट्रोलने भरलेला टँकर बाहेर काढण्यात आला. तसेच, वाहन चालकांना देखील पंपाबाहेर काढण्यात आले. स्फोटची माहिती आसपासच्या परिसरात पासरताच पंपावर बघ्यांची एकच गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच कोथरूड आग्नशमक दलाचे जवान आणि बंब घटनास्थळी दाखल झाला. तसेच, कोथरूड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी देखील घटनास्थळी धावले. 

याबाबत कोथरूड पोलीस ठाण्याचे (Kothrud Police) वरिष्ठ निरीक्षक संदेश देशमाने म्हणाले, की पेट्रोल पंपावरील भूमिगत टाकीमध्ये एअर पकडलेला होता. त्यामुळे टाकीचे झाकण उडाले. त्यावेळी मोठा आवाज झाला होता. याठिकाणी कोणताही स्फोट झाला नाही. सर्व परिस्थिती व्यवस्थित आहे. कोणीही अफवा पसरवू नयेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest