PUNE: भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी लगावली पोलीसाच्या श्रीमुखात

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमादरम्यान भाजपाच्या एका आमदाराने बंदोबस्तावरील पोलिसाच्या श्रीमुखात लगावल्याची घटना घडली. भाजपचे आमदार सुनील कांबळे

PUNE: भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी लगावली पोलीसाच्या श्रीमुखात

थेट उपमुख्यमंत्र्यांसमोरच घडला प्रकार

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमादरम्यान भाजपाच्या एका आमदाराने बंदोबस्तावरील पोलिसाच्या श्रीमुखात लगावल्याची घटना घडली. भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या थोबाडीत लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कार्यक्रमाच्या मंचावरून खाली उतरत असताना सुनील कांबळे यांचा तोल गेला आणि हा पोलीस कर्मचारी तिथे उभा होता. मागचा पुढचा विचार न करता सुनील कांबळे (Sunil Kamble) यांनी थेट या कर्मचाऱ्यांच्या थोबाडीत लगावल्याने पोलीस दलातून संताप व्यक्त केला जात आहे. (Pune Police)

सुनील कांबळे यांच्यावर यापूर्वी देखील महापालिकेतील एका महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप झाला होता. त्याची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. सतत या ना त्या कारणाने आमदार सुनील कांबळे वादामध्ये अडकलेले असतात. थेट उपमुख्यमंत्र्यांसमोरच हा प्रकार घडल्याने आता तरी आमदारावर गुन्हा दाखल होणार का आणि पोलीस कारवाई करणार का याकडे लक्ष लागले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest