Pune Metro : पुण्यात चोरट्यांनी पळवले मेट्रोचे खांब; पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

शिवाजीनगर भागातील कामगार पुतळा परिसरातून मेट्रोचे दोन लाख रुपयांचे लोखंडी खांब चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 13 Jan 2025
  • 01:57 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

शिवाजीनगर भागातील कामगार पुतळा परिसरातून मेट्रोचे दोन लाख रुपयांचे लोखंडी खांब चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली.

गणेश मच्छिंद्र कांबळे (वय ४८), अनिकेत महेंद्र कांबळे (वय २७), तौसिफराज फैजअहमद शेख, शमशुद्दीन युसुफअली शेख मन्सुरी (सर्व रा. कामगार पुतळा, शिवाजीनगर), वसीम अयुब पठाण (वय ३२, रा. इंदिरानगर, गुलटेकडी), मुस्तफा मुस्तकीम शेख (वय ३५, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत मेट्रोचे सुरक्षारक्षक चंद्रकांत शेलार (वय ५१, रा. थेरगाव, चिंचवड) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. शिवाजीनगर न्यायालय परिसरातील कामगार पुतळा परिसरात मेट्रोचे साहित्य ठेवण्यात आले आहे, दोन दिवसांपूर्वी कांबळे, शेख, मन्सुरी, पठाण यांनी कामगार पुतळा परिसरात ठेवलेले दोन लाख रुपयांचे लोखंडी खांब चोरले. एका वाहनात भरुन ते भंगारात विक्री करणार होते.

मेट्रोचे सुरक्षारक्षक चंद्रकांत शेलार यांनी त्यांना हटकले. आरोपी लोखंडी खांब चोरुन नेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती मेट्रोचे अधिकारी, तसेच पोलिसांना दिली. सहा जणांना पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक कवीराज पाटील तपास करत आहेत.

Share this story

Latest