PMPML: पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्याने महिलेशी गैरवर्तन केल्याचा आरोप

पुणे: निगडी बायपास या गाडीची चौकशी करणाऱ्या कर्मचाऱ्याने त्या महिलेशी गैरवर्तन करुन शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला

PMPML: पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्याने महिलेशी गैरवर्तन केल्याचा आरोप

कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी

पुणे: निगडी बायपास या गाडीची चौकशी करणाऱ्या कर्मचाऱ्याने त्या महिलेशी गैरवर्तन करुन शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आझाद समाज पक्षाने याबाबतची तक्रार पीएमपीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली असून कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कात्रज डेपोवरुन निगडीला एका महिलेला जायचे होते. त्यामुळे या बसच्या वेळेची चौकशी करण्यासाठी महिने डेपोवरील चौकशी कक्षातील एका कर्मचाऱ्याला माहिती विचारली. मात्र त्यांना त्याचा राग आला. त्यातून त्यांनी महिलेशी उध्दट भाषेत संवाद साधला. तसेच महिलेच्या अंगावर धावून तिच्याशी गैरवर्तणूक करुन तिला लाजवेल अशी पध्दतीने शिवीगाळी केल्याचे पक्षाचे पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष निखिल मनोज भिंगारदिवे यांनी पत्रात नमूद केले आहे. 

पीएमपीचा कर्मचारी आणि महिला यांच्यात वाद सुरु असताना कर्मचाऱ्याने पीएमपीच्या नावाने देखील शिवीगाळ केली. तसेच तेथे असलेल्या एकाने मध्यस्थी केल्याने कर्मचाऱ्याचा राग अनावर झाला. त्यातून त्यांनी 'तुझा इथे काय काम आहे, माझ्याकडे बघू नकोस! असे सांगून दम दिली. जनसेवेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जनतेला अशी वागणूक दिली, तर त्यांना काम करण्याचा अधिकार नाही. त्यांनी शिस्त भंग केल्याने त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच कारवाई न झाल्यास आझाद समाज पक्षातर्फे कात्रज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा दिला आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी सतीश घाटे यांनी संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest