संग्रहित छायाचित्र
पिंपरी: इंस्टाग्रामवरून मैत्री झालेल्या तरुणीने तरुणाला मेसेज करून भेटायला बोलावले. त्यानंतर तरुणाचा मोबाईल फोन घेऊन तरुणी पळून गेल्याची घटना मंगळवारी (२७ फेब्रुवारी) सकाळी अकरा वाजता समृद्धी हॉटेल, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pimpri Chinchwad Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीने फिर्यादी तरुणाला इंस्टाग्रामवर मेसेज केला. त्याला मेसेज करून पिंपरी येथे भेटायला बोलावले. पिंपरी येथे दोघांची भेट झाली. तिथे तरुणीने तरुणाकडे त्याचा फोन मागितला. मात्र फोन देण्यास तरुणाने नकार दिला. त्यावरून तरुणीने 'तू तुझा मोबाईल दे नाहीतर मी आरडाओरडा करून लोकांना तू माझी छेड काढतो असे सांगेल.
माझ्या मित्रांना बोलावून घेऊन तुला मारायला सांगेल' अशी धमकी दिली. तरुणाच्या खिशातून ४५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन तरुणीने जबरदस्तीने काढून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.