संग्रहित छायाचित्र
पिंपरी चिंचवड: रिक्षाचालकाने प्रवाशासोबत २० रुपयांवरून भांडण करून मी इथला भाई आहे, तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणत प्रवाशाच्या डोक्यात दगड मारून खुनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (२७ फेब्रुवारी) सकाळी साडे अकरा वाजता महाळुंगे येथे घडली. (Pimpri Chinchwad Crime)
रिक्षाचालक रोहन शहाजी गायकवाड (वय २३, रा. चाकण. मूळ रा. अहमदनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी जखमी व्यक्तीच्या पत्नीने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला आणि त्यांचे पती बँकेत कामाला जाण्यासाठी रिक्षातून जात होते. ते महाळुंगे कमानीजवळ रिक्षातून उतरले. तिथे रिक्षाचे २० रुपये सुट्टे न दिल्याच्या कारणावरून रिक्षा चालकाने फिर्यादी यांच्या पतीसोबत वाद घातला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.