संग्रहित छायाचित्र
भोसरी: बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन अनोळखी चोरट्याने प्रवासी महिलेच्या पर्समधून २१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (२७ फेब्रुवारी) दुपारी साडेतीन वाजता पीएमटी बस थांबा, भोसरी येथे घडली. याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pimpri Chinchwad Crime)
त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना भोसरी येथून मंचर येथे जायचे होते. त्या भोसरी येथील पीएमटी बस थांब्यावर थांबल्या. अकोला-पुणे या बसमध्ये त्या चढत असताना अज्ञाताने त्यांच्या पर्समधून १० लाख ७५ हजार रुपये किमतीचे २१.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.