Pimpri Chinchwad: ‘क्रिएटिव्ह’वर बनावट प्रमाणपत्रप्रकरणी गुन्हा

पिंपरी चिंचवड: दहावीतील विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार क्रिएटिव्ह अकॅडमीच्या (Creative Academy News) स्कूलमध्ये उघडकीस आल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल झाला.

Creative Academy

संग्रहित छायाचित्र

क्रिएटिव्ह एज्युकेशनच्या शाळेचे ‘सीबीएसई’ ना हरकत प्रमाणपत्र आढळले बनावट

(विकास शिंदे)
पिंपरी चिंचवड: दहावीतील विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार क्रिएटिव्ह अकॅडमीच्या (Creative Academy News) स्कूलमध्ये उघडकीस आल्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर रावेतच्या क्रिएटिव्ह एज्युकेशनल सोसायटी संचालित पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर काॅलेजचे सीबीएसईचे ना हरकत प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे बनावट प्रमाणपत्र तयार केल्याप्रकरणी रावेत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pimpri Chinchwad News)

या प्रकरणी सहायक प्रशासन अधिकारी रिझिया खान यांनी रावेत पोलीस ठाण्यात १७ फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

क्रिएटिव्ह एज्युकेशनल सोसायटी संचालित पब्लिक स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेजच्या संस्थाचालकांकडे सीबीएसईचे ना हरकत प्रमाणपत्र बोगस असल्याचे आढळून आले. त्यामुळे क्रिएटिव्ह स्कूलविरोधात गुन्हा दाखल करावा, असा आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १४ जुलै २०२२ रोजी दिला होता.

अठरा महिने उलटले तरीही शाळेविरोधात गुन्हा दाखल झालेला नव्हता. शिक्षण संस्थेच्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्या संदर्भात रावेत पोलीस आणि शिक्षण विभागाकडून एकमेकांवर टोलवा-टोलवी सुरू होती.

रावेत येथील क्रिएटिव्ह एज्युकेशनल सोसायटी संचालित पब्लिक स्कूल ॲन्ड ज्युनिअर काॅलेज, पुणे यांच्याकडील सीबीएसई शाळेचे ना हरकत प्रमाणपत्र अनुषंगाने अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर पोलीस ठाण्यात दाखल करावा, असे आदेश १४ जुलै २०२२ रोजी शालेय शिक्षण विभागाचे उप सचिव समीर सावंत यांनी दिले होते. त्यानंतर उपसंचालक कार्यालयाकडून महापालिकेच्या शिक्षण प्रशासन अधिका-यांना १० जानेवारी २०२३ रोजी दिलेल्या पत्रानुसार या शाळेच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, असे म्हटले होते.

शिक्षण विभागाच्या सहायक प्रशासन अधिकारी रजिया खान यांनी रावेत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना १६ मे ०२३ रोजी तक्रारी अर्ज दिला. त्यात क्रिएटिव्ह पब्लिक इंग्लिश मिडियम स्कूल, रावेत यांचे सीबीएसई स्कूलचे ना हरकत प्रमाणपत्र बोगस असून त्या अनुषंगाने अज्ञात व्यक्तीविरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंद करावा, अशी अर्जाद्वारे मागणी केली आहे.

त्यानुसार रावेतच्या क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेला सीबीएससीचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असून त्याला राज्य शासनाची परवानगी आवश्यक असल्याचे म्हटले होते. मात्र शाळेतील अज्ञातांनी उपसचिव, महाराष्ट्र शासन यांच्या सहीचे एक बनावट पत्र तयार केले आणि शाळेला सीबीएससी मंडळाचे बनावट प्रमाणपत्र आढळून आल्याने अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केल्याचे सहायक प्रशासन अधिकारी रझिया खान यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

‘सीविक मिरर‘चा दणका..

रावेत पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी या शाळेवर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देऊन आठ महिने झाले तरी प्रथम माहिती अहवाल नोंद केलेला नाही. उलट सहायक प्रशासन अधिकारी यांच्याकडून केवळ तक्रारी अर्ज दाखल करून घेतला आहे. त्यामुळे क्रिएटिव्ह पब्लिक इंग्लिश मिडियम स्कूलचे ना हरकत प्रमाणपत्र बोगस असताना पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. तसेच महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून तक्रारी अर्ज दिल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा घेतलेला नाही. त्यामुळे शिक्षण विभाग आणि रावेत पोलिसांकडून संबंधित संस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्यास एकमेकांवर टोलवा - टोलवी केल्याचे दिसून आले. त्यामुळे अठरा महिने होऊनही क्रिएटिव्ह स्कूल सीबीएसई ना हरकत प्रमाणपत्र बनावट असून गुन्हा दाखल होत नव्हता. या संदर्भात ‘सीविक मिरर’ने ६ फेब्रुवारी २०२४ रोजी वृत्त प्रसिध्द केल्यावर रावेत पोलीस खडबडून जागे झाले आणि त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest