पिंपरी-चिंचवड : तरुणीची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक

प्रीपेड टास्कच्या बहाण्याने तरुणीची तब्बल १३ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना २८ फेब्रुवारी २०२४ ते ४ मार्च २०२४ या कालावधीत चिंचवड येथे घडली आहे. या प्रकरणी २७ वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात रविवारी (२१ एप्रिल) फिर्याद दिली आहे.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

निगडी : प्रीपेड टास्कच्या बहाण्याने तरुणीची तब्बल १३ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना २८ फेब्रुवारी २०२४ ते ४ मार्च २०२४ या कालावधीत चिंचवड येथे घडली आहे. या प्रकरणी २७ वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात रविवारी (२१ एप्रिल) फिर्याद दिली आहे. (Pimpri Chinchwad Crime News) 

या प्रकरणी विविध मोबाईल क्रमांकधारक, बँक खातेधारक अशा १४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईलवर आरोपीने निम्म्याने संपर्क साधला. फिर्यादीला ऑनलाईन प्रीपेड टास्क दिला. यावरून फिर्यादीला वेळोवेळी टास्क देऊन टास्कचा मोबदला देण्यासाठी पैसे घेऊन फिर्यादीची १३  लाख ८९ हजार २५५ रुपयांची फसवणूक केली. यावरून निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest