संग्रहित छायाचित्र
नगर-कल्याण महामार्गावरील कोळवाडी (ता.जुन्नर) येथे सकाळी सात वाजता ओतूरकडून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल आणि कल्याणकडून ओतूरच्या दिशेने येणाऱ्या एर्टिंगा कारची समोरासमोर धडक होऊन अपघातात बाराजण जखमी झाले. अपघातातील जखमींवर आळेफाटा व मढ रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुरेश गेंगजे, भरत सूर्यवंशी,शामसुंदर जायभाये,संदीप भोते,किशोर बर्डे, ज्योतीराम पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णालयात पाठवले. तसेच अपघातस्थळावरील स्थिती नियंत्रणाखाली आणली.
या अपघातात आनंद झावरे,तय्युब शेख,अक्षय ठुबे,स्वप्नील दाते,सुदर्शन फापाळे,प्रदीप वाघचौरे (सर्व राहणार पारनेर,जि.अहमदनगर),विमल शिंदे,मनीषा कांगणकर,भगवान कानडे, चंद्रकांत शिंदे,सरिता कानडे,युवराज शिंदे,प्रेमिषा कांगणकर (सर्व रा.मुंबई) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघाताचा तपास ओतूर पोलीस करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.