नव्या व्यसनांनी उडवली झोप

टीव्ही, इंटरनेट, सोशल मीडियावरून खेळल्या जाणार्या रमी, पोकर, तीन पत्ती, क्रिकेटच्या ऑनलाईन जुगारांनी अनेकांची झोप उडवली आहे. याचे व्यसन लागलेले अनेक तरुण तसेच प्रौढ लाखो-कोट्यवधी रुपये गमावल्यावर, मोठे कर्ज झाल्यावर नैराश्याच्या आहारी गेले आहेत. अशा अनेकांवर व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होऊन उपचार घेण्याची वेळ आली आहे.

जाहिरातींचा सातत्याने मारा होत असल्याने 'इझी मनी' च्या 'ट्रॅप'मध्ये अनेक तरुण अडकत आहेत.

पोकर, तीन पत्ती, रमी, क्रिकेट या ऑनलाईन जुगाराचा फास, ‘मनी मेकिंग’ गेम्सचा अब्जावधींचा बाजार, अनेकांना व्यसन जडल्याने आयुष्याची धूळधाण, 'गेमिंग डिसऑर्डर'ने घेरलेले अनेक तरुण, प्रौढ व्यसनमुक्ती केंद्रात दाखल

 

टीव्ही, इंटरनेट, सोशल मीडियावरून खेळल्या जाणार्या रमी, पोकर, तीन पत्ती, क्रिकेटच्या ऑनलाईन जुगारांनी अनेकांची झोप उडवली आहे. याचे व्यसन लागलेले अनेक तरुण तसेच प्रौढ लाखो-कोट्यवधी रुपये गमावल्यावर, मोठे कर्ज झाल्यावर नैराश्याच्या आहारी गेले आहेत. अशा अनेकांवर व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होऊन उपचार घेण्याची वेळ आली आहे.

या ऑनलाईन जुगारांची होणारी जाहिरात आणि त्याला बळी पडणारे तरुण तसेच प्रौढ हा दिवसेंदिवस अधिकाधिक चिंतेचा विषय ठरत आहे.  अशामनी मेकिंगगेम्समुळे अनेकांच्या आयुष्याची धूळधाण झाली आहे, तर अनेकजण या मार्गावर आहेत.
या गेम्सच्या जाहिरातींचा सातत्याने मारा होत असल्याने 'इझी मनी' च्या 'ट्रॅप'मध्ये अनेक तरुण अडकत आहेत. झटपट पैसे कमावण्याच्या नादात अनेक तरुणमनी मेकिंगगेम्समध्ये लाखो रुपये उडवत असून त्यांना ऑनलाईन जुगार खेळण्याचे व्यसनच जडले आहे.

ऑनलाईन क्रिकेट, पोकर, तीन पत्ती, ऑनलाईन रमीच्या भूलभुलैयामध्ये अडकलेल्या तरुणांना 'गेमिंग डिसऑर्डर'ने घेरले असून पालक, समुपदेशक आणि मुलांना इंटरनेट ॲडिक्शन सेंटरमध्ये चकरा मारत आहेत. 'स्किल गेमिंग'च्या गोंडस नावाखाली कायदेशीर पळ काढत विविध प्रलोभने दाखवत लोकांना या ऑनलाइन जुगाराकडे आकर्षित केले जात असल्याचे चित्र आहे.


याबाबतसीविक मिररला अधिक माहिती देताना मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुख डॉ. मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, ‘‘मुक्तांगणमार्फत चालविल्या जाणाऱ्या इंटरनेट ॲडिक्शन रिहॅब सेंटरमध्ये असे तरुण उपचारांसाठी येत आहेत. त्यांचे समुपदेशन केले जात आहे. एक प्रकारे त्यांना या गेम खेळण्यासाठी उद्युक्त केले जात आहे. जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर मारा केला जात आहे. एकदा गेम खेळायला सुरुवात केली की सुरुवातीला पैसे जिंकतात. नंतर, मात्र हरत जातात. आपण कधी तरी जिंकू, या आशेवर तरुण खेळत जातात आणि पैसे घालवत जातात. अनेकजण यातून कर्जबाजारी झाले आहेत. नंतर त्यांना नैराश्य येते. मग एकामागे एक व्यसने जडत जातात. निम्न मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांचा यामध्ये अधिक समावेश आहे. आपल्या मुलींनी केलेले लाखो रुपयांचे  कर्ज कसे फेडायचे, हा प्रश्न अशा अनेक मुलांच्या आई-वडिलांसमोर निर्माण झाला आहे.’’
 
 आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख अजय दुधाने म्हणाले, ‘‘आमच्या इंटरनेट ॲडिक्शन सेंटरमध्ये ऑनलाईन रमी, पोकर, क्रिकेट, तीन पत्ती आदी गेम्सचे व्यसन जडलेले काही तरुण उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांचे समुपदेशन केले जात आहे. गेम्समधून आर्थिक लत लावणे, त्यांची जिंकण्याची आशा जिवंत ठेवत आणखी खेळायला प्रवृत्त केले जाते. पैसे नसतील तर ऑनलाईन पद्धतीने शून्य टक्के व्याजदराने कर्ज द्यायचे ऑनलाइन रॅकेट काम करीत आहे. ऑनलाईन गेम आणि रमी खेळून पैसे कमाविण्याच्या भानगडीत पडलेल्या तरुणांना मानसिक आजार जडण्याची सुरुवात झाली आहे. मोबाईल ॲप डाऊनलोड करून पैसे कमविण्याच्या आमिषाला हे तरुण-तरुणी बळी पडतात. महिला, नोकरदार, महाविद्यालयीन विद्यार्थी अशा सर्वच स्तरातील लोक त्याच्या आहारी जात आहेत. झटपट पैसे मिळवण्याचा हा मार्ग आयुष्य उद्ध्वस्त करणारा असल्याने मुलांना पालकांनी वेळीच सावरले पाहिजे.’’


या संदर्भात सायबरतज्ज्ञ रोहन न्यायाधीश म्हणाले, ‘‘या कंपन्यांचे सर्व्हर इंडियात नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात नाही. यातील बहुतांश कंपन्या दुबई, दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये ऑनलाइन जुगाराला कायदेशीर मान्यता आहे. शासनदरबारी यावर कारवाई होण्याची आणि या साईट्स ब्लॉक होण्याची वाट पाहात बसण्यापेक्षा आपण जागृती करून त्याला प्रतिबंध करणे आवश्यक आहे.’’

गुगलवर शेकडो रमी गेम्स आहेत. यासोबतच क्रिकेटच्या गोंडस नावाखाली 'मनी मेकिंग गेम्स' अर्थात जुगार चालविले जात आहेत. या सर्व कंपन्यांनी कायद्याच्या कचाट्यामधून 'स्किल गेम्स' च्या नावाखाली आपली सुटका करून घेतली आहे. काही कंपन्या तर जाहिरातीमध्येचयाचे व्यसन लागू शकतेअसे स्पष्ट सांगतात. हा जुगार खेळण्यासाठी कुठेही बाहेर जावे लागत नाही. हातामध्ये असलेल्या स्मार्टफोनवर हा जुगार खेळता येतो. त्यामुळे अगदी १८ वर्षांखालील मुलेदेखील त्याच्या आहारी जाऊ लागली आहेत. लाखो रुपये गमावल्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट येत असून यामधून येणारे नैराश्य ही मोठी समस्या बनत आहे.

ऑनलाईन जुगारामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेली उदाहरणे
. मोबाईलवर ऑनलाईन रमी खेळण्याचे व्यसन लागलेल्या शेखर रमेश सुक्रे (वय २२, रा. राजगुरुनगर) या तरुणाने नैराश्यामधून आत्महत्या केल्याची घटना ऑगस्ट २०२२ मध्ये घडली होती. ऑनलाइन रमीमध्ये मोठी रक्कम हरल्याने तो कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे तो घर सोडून निघून गेला. त्याचा मृतदेह राजगुरुनगर येथील एका निर्जनस्थळी झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

. एका २५ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाला त्याच्या आई-वडिलांनी तपासणीसाठी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. या तरुणाला ऑनलाइन क्रिकेट गेम खेळण्याचे व्यसन जडले होते. या गेममध्ये प्रत्येक बॉलवर पैशांची बोली लावत त्याने तब्बल ६२ लाख रुपये घालवले. हरलेले पैसे जिंकण्याच्या आशेने त्याने अनेकांकडून व्याजाने कर्ज काढले.

. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात नुकताच एक व्यावसायिक दाखल झाला होता. त्याने ऑनलाईन जुगारात सुमारे दीड कोटी रुपये घालवले. यामधून झालेल्या कर्जापायी त्याला स्वत:चे राहते घर विकावे लागले. उपचार घेऊन गेलेला हा व्यावसायिक सध्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत आहे.

. ऑनलाइन गेमिंगच्या (जुगार) आहारी गेलेल्या नीरज अशोक मानकानी (वय २४, रा. श्रीनगर, गोंदिया) याने लाखो रुपये गमावले होते. नैराश्य आल्याने त्याने २८ जुलै २०२३ रोजी स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

. ऑनलाईन रमी खेळण्याची सवय लागलेल्या पनवेल येथील संजय जुनात्रा (वय ५५) यांनी रमी खेळण्यासाठी कर्ज काढले. ते पैसे हरल्याने अजून कर्ज काढले. मात्र, ते कधीच जिंकू शकले नाहीत. या तणावामधून त्यांनी जुलै २०२३ रोजी आत्महत्या केली.


ऑनलाईन जुगारासोबत येणारेकनेक्टेड ॲडिक्शन


यागेमिंग डिसऑर्डरमुळे अनेक तरुणांना निद्रानाशाचा आजार जडला आहे. रात्री उशिरापर्यंत ऑनलाइन जुगार खेळला जात असल्याने अनेकांची झोप नीट होत नाही. जेवण नीट होणे, चिडचिड होणे असे स्वभावात बदल घडत चालले आहेत. लाखो रुपये घालवून बसल्यामुळे येणारे नैराश्यदेखील चिंतेचा विषय ठरत आहे. त्यावर मात करण्यासाठी दारू, सिगारेट, अमली पदार्थ अशा व्यसनांच्या गर्तेत तरुण अडकत आहेत. त्याला व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञकनेक्टेड ॲडिक्शनअसे म्हणतात. ऑनलाइन गेम्स खेळून अनेक जण मोठे आर्थिक नुकसान करून घेत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. प्रसंगी कर्ज काढूनही ऑनलाईन जुगार खेळण्याची तलफ भागविली जाते. ‘ईझी मनीच्या मोहजाळात अडकत चाललेल्या तरुणाईचे आई-वडील मात्र, त्यांच्यावर झालेल्या लाखो रुपयांच्या कर्जामुळे धास्तावले आहेत. कोविडनंतर यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest