Pune Crime : बहिणीसोबतच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून खून

बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणाची धारदार हत्याराने वार करून खून(Murder) करण्यात आला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याची दुचाकी नदीमध्ये फेकून देण्यात आली. ही घटना १९ डिसेंबर साडेअकरा ते २० डिसेंबर दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली.

Pune Crime

बहिणीसोबतच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून खून

पुणे : बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणाची धारदार हत्याराने वार करून खून(Murder) करण्यात आला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याची दुचाकी नदीमध्ये फेकून देण्यात आली. ही घटना १९ डिसेंबर  साडेअकरा ते २० डिसेंबर दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी (Chatusringi Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

राजेश कांबळे(Rajesh Kamble) (वय २५) असे खून झालेल्याचे नाव आहे. राहुल शेषराव रिकामे (Rahul Rikame) (वय २०, रा. बालेवाडी), सय्यद जमीर (Sayyad Jamir)  उर्फ साहिल उर्फ बाब्या सय्यद नूर (वय २०, रा. बालेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी मुलगा आणि आरोपी मित्र आहेत. राजेश हा त्यांच्या ओळखीचा होता. राहुल याला त्याच्या बहिणीशी त्याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यावरून लोखंडी हत्याराने वार करून ठार मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याची गाडी वाकड येथील नदीमध्ये फेकून दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest