Pune Crime News: दारूच्या नशेत कामगाराचा खून

पुणे : दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून तरुणाने ३७ वर्षीय कामगाराचा हत्याराने चेहऱ्यावर वार करून खून केल्याची घटना येवलेवाडी येथील पिरामिड या नावनिर्माणाधीन इमारतीच्या लेबर कॅम्पमध्ये

Murder

संग्रहित छायाचित्र

तरुणाला कोंढवा पोलिसांकडून अटक

पुणे : दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून तरुणाने ३७ वर्षीय कामगाराचा हत्याराने चेहऱ्यावर वार करून खून केल्याची घटना येवलेवाडी येथील पिरामिड या नावनिर्माणाधीन इमारतीच्या लेबर कॅम्पमध्ये घडली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Pune crime news)

कमल रोहित ध्रुव (वय १९) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अब्दुल वाहिद हमीद अंसारी (वय ४०, रा. तुपे कॉर्नर, माळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. मोहम्मद नसीम उर्फ समीर सैदुल्लाह अन्सारी (वय ३७) असे खून झालेल्याचे नाव आहे. आरोपी कमल ध्रुव आणि अंसारी हे पिरॅमिड या या इमारतीच्या बांधकाम साईटवर कामगार म्हणून काम करीत होते. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आरोपीने दारूच्या नशेत अज्ञात कारणावरून मोहम्मदच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याखाली वार केले आणि त्याला ठार मारल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest