फुटपाथवर झोपण्याच्या वादामधून खून, खडकीतील घटना
पुणे : फुटपाथवर झोपण्याच्या वादातून ७५ वर्षीय फिरस्त्याचा धारदार (Pune Crime News) हत्यारांनी वार करून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खडकी रेल्वे स्टेशनकडे (Khadki Railway Station) जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला घडली.
मंगेश भागाजी भद्रिके (Mangesh Bhagaji Bhadrake) (वय ७५, रा. खडकी रेल्वे स्टेशन फुटपाथ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विकास रामचंद्र गायकवाड (रा. खडकी बाजार चौपाटी, खडकी) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अण्णा बादशाह गुंजाळ पोलीस उपनिरीक्षक यांनी फिर्याद दिली आहे.
गायकवाड आणि भद्रिके हे फुटपाथवर राहतात. शनिवारी त्यांच्यामध्ये फुटपाथवर झोपण्यावरून वाद झालेला होता. त्यावेळी गायकवाड याने दारू पिऊन येऊन धारदार हत्याराने भद्रिके यांच्या डोक्यावर, पाठीवर, हातावर वार करून त्यांचा खून केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.