दहशत पसरविणाऱ्या जुनेद शेख टोळीवर मोक्का कारवाई

येरवडा परिसरात नागरिकांना धमकावून त्यांच्यावर दगडफेक केल्या प्रकरणी तसेच परिसरातील २७ वाहनांच्या काचा फोडुन, हातातील धारधार हत्यारे घेवून दहशत करणाऱ्या जुनेद एजाज शेख ( टोळी प्रमुख ) व त्याच्या इतर ४ साथीदारांवर पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी मोक्का कारवाई केली आहे.

संग्रहित छायाचित्र

येरवडा परिसरात नागरिकांना धमकावून त्यांच्यावर दगडफेक केल्या प्रकरणी तसेच परिसरातील  २७ वाहनांच्या काचा फोडुन, हातातील धारधार हत्यारे घेवून दहशत करणाऱ्या जुनेद एजाज शेख ( टोळी प्रमुख ) त्याच्या इतर साथीदारांवर  पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी मोक्का कारवाई केली आहे.

जुनेद एजाज शेख (वय २३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), अविनाश ऊर्फ सुक्या संजय शिंदे (वय २१, रा. येरवडा), मंगेश ऊर्फ घुल्या दीपक काळोखे (वय १९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), निखील ऊर्फ बॉडी जगन्नाथ शिंदे (वय २३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) त्यांचा एक साथीदार यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. निखील शिंदे हा फरार असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा टोळी प्रमुख असून तो त्याच्या साथादारांसोबत हैद्राबाद हॉटेलचे बाजुने हातातील लोखंडी धारधार हत्यारे दगड घेवून फिरत होते. तसेच नागरिकांना शिवीगाळ करून, कोई आगे आयेगा, तो नहीं छोडेंगे, अपने अपने घर जाओ  असे म्हणत धमकी दिली. तसेच फिर्यादी त्यांचा भाऊ तसेच नागीरकांना धमकावून त्यांच्यावर दगडफेक केली. हातातील धारधार हत्यारे दगडांनी फिर्यादींना मारहाण केली. परिसरातील इतर २७ वाहनांच्या काचा फोडुन दहशत निर्माण केली. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार येरवडा पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

टोळी प्रमुख जुनेद एजाज शेख याने त्याच्या इतर साथीदारांनी मिळून संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. या टोळीने येरवडा परीसरात दहशत निर्माण केली. स्वतःसाठी इतरांसाठी आर्थिक फायदा मिळविण्याचे उद्देशाने तसेच या परिसरात त्यांचे टोळीचे वर्चस्व वाढवण्यासाठी हिंसाचार घडवला. नागरीकांच्या मनात भिती निर्माण करुन, त्यांनी अवैध मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य करणे सुरु ठेवले. त्यांनी संघटना किंवा टोळी म्हणुन संयुक्तपणे संघटीत गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला असुन सदर टोळीने दरोडा घालणे, सदोष मुनष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगा करणे, प्राणघातक हत्यारे सतत जवळ बाळगणे, दुखापत किंवा हल्ला करण्याची पुर्वतयारी करणे, गृह-अतिक्रमण करणे, निरपराध व्यक्तीस अटकाव करुन अन्यायाची कैद करणे, दहशत माजवणे, जीवे मारण्याची धमकी देणे, रोजंदारीवर उदरनिर्वाह असलेल्यांच्या वाहनांच्या काचा फोडुन नुकसान करणे, दिवसा रात्रीचे वेळी घरफोडी करणे तसेच आजु- बाजुच्या परिसरातील गरीब, असहाय्य युवकांना जमवुन त्यांना पैशाचे इतर प्रकारचे अमिष दाखवून, त्यांना वेग-वेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्यांचे साथीदार बनवुन त्यांच्याकडून गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे. या टोळीवर  यापुर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. परंतु त्यानंतरीह त्यांनी गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. त्यामुळे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम या कलमानुसार येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी परिमंडळे चार चे पोलीस उप-आयुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्फत  पुर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest