लग्नाच्या आमिष दाखवत तरुणीसोबत गैरकृत्य

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत लग्न करण्यास नकार दिल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २१ जून २०२३ रोजी घडला.

संग्रहित छायाचित्र

सिंहगड रोड:
 लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत लग्न करण्यास नकार दिल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार २१ जून २०२३ रोजी घडला. प्रज्वल नितीन सिदनकर (वय २४, रा. श्रीगोंदा, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी २४ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. आरोपीने या तरुणीला मोटरसायकलवरून विविध ठिकाणी फिरायला नेले. तिला आपण लग्न करू, असे आश्वासन दिले. तिच्यासोबत प्रेमाचे नाटक करीत सात ते आठ वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच, आरोपीने तिला त्यांच्यातील संबंधांची माहिती घरी देण्याची भीती घातली. त्या पोटी तिच्याकडून वेळोवेळी पैशांची मागणी केली. कालांतराने पैसे देण्यावरून त्यांच्यामध्ये वाद सुरू झाले. या तरुणीने तिच्या अकाउंटवरील पैसे या तरुणाला देणे बंद केले. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार 'तुझ्या घरी सांगतो आणि तुझ्याशी लग्नदेखील करणार नाही' अशी धमकी देत तिला शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest