Pune Crime : मेट्रोच्या कामावरील सिक्युरिटी सुपरवायझरला मारहाण; येरवडा पोलीसांची माहिती देण्यास टाळाटाळ

येवड्यात मेट्रोचे काम सुरु आहे. या ठिकाणी मेट्रोने सिक्युरिटीसाठी ठेकेदारीची नेमणूक केली आहे. त्या ठेकेदाराकडून नेमण्यात आलेल्या सुपरवायझरला येरवड्यातील दोन तरुणांना विनाकारण मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Pune Crime

मेट्रोच्या कामावरील सिक्युरिटी सुपरवायझरला मारहाण; येरवडा पोलीसांची माहिती देण्यास टाळाटाळ

पुणे: येवड्यात मेट्रोचे काम सुरु आहे. या ठिकाणी मेट्रोने सिक्युरिटीसाठी ठेकेदारीची नेमणूक केली आहे. त्या ठेकेदाराकडून नेमण्यात आलेल्या सुपरवायझरला येरवड्यातील दोन तरुणांना विनाकारण मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News) 

या प्रकरणी गोल्ड्या उर्फ सचिन गवळी (वय ३०) आणि मंगेश (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्यावर येरवडा पोलीस (Yerwada Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जयंत बबन पिसाळ (वय ५२, रा. वृंदावन पार्क सोसायटी, कवडे वस्ती, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोकडून करण्यात येणाऱ्या कामावरील साहित्यावर तसेच इतर कामासाठी खासगी ठेकेदाराची सिक्युरिटी नेमली आहे. या साईडवरील सुपरवायझर पिसाळ आणि आरोपी गोल्ड्या यांचा यापूर्वी वाद झाला होता. त्याचा राग गोल्ड्या या मनात होता. शनिवारी गोल्ड्याने मद्य प्राशन केल्याने तो नशेत होता. येरवड्यातील ताडीगुत्ता येथील नदीपात्रातून जात असताना त्याला फिर्यादी पिसाळ दिसले. त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यातून गोल्ड्या आणि त्याचा मित्र मंगेश या दोघांनी मिळून पिसाळ यांच्या सह त्यांच्या कंपनीतील सहकार्यांना धक्काबुक्की केली. तसेच त्यांची चारचाकी गाडी फावड्याच्या लाकडी दांडक्याने फोडली. तसेच त्याच दांडक्याने पिसाळ यालाही मारहाण करुन जखमी केले, तसेच बघून घेण्याची धकमी दिली. आरोपी गोल्ड्या याला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र मंगेश हा आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या आरोपींची अधिक माहिती विचारली असताना पोलिसांनी ती देण्यास टाळाटाळ केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest