मक्याच्या शेतात गांजाचे पिक; ११ लाख ५० हजारांचा २३ किलो गांजा जप्त

चाकण : चाकण जवळील आगरवाडी येथील एका शेतकऱ्याने चक्क मक्याच्या शेतात गांजाचे पिक घेतले. त्याने मक्याच्या शेतात गांजाची ६६ झाडे लावली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी कारवाई करत ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा २३ किलो गांजा जप्त केला.

मक्याच्या शेतात गांजाचे पिक

चाकण : चाकण जवळील आगरवाडी येथील एका शेतकऱ्याने चक्क मक्याच्या शेतात गांजाचे पिक घेतले. त्याने मक्याच्या शेतात गांजाची ६६ झाडे लावली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी कारवाई करत ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा २३ किलो गांजा जप्त केला. ही कारवाई सोमवारी (२२ एप्रिल) दुपारी करण्यात आली. 

सदाशिव आप्पासाहेब देशमुख (वय ६५, रा. आगरवाडी रोड, चाकण) असे गांजाचे पिक घेणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांना आगरवाडी रोडवर एका शेतकऱ्याने आपल्या शेतात गांजा लावला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, चाकण पोलिसांनी चाकण-काळूस रोडवर असलेल्या देशमुख यांच्या शेतात जाऊन खात्री केली. 

त्यावेळी मक्याच्या शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे आढळून आली. तब्बल आठ ते दहा फूट उंचीची ६६ झाडे पोलिसांना मिळाली. या झाडांचे वजन २३ किलो होते. तर याची किंमत ११ लाख ५० हजार रुपये आहे. पोलिसांनी गांजाची झाडे जप्त करत देशमुख याला अटक केली आहे. चाकण पोलिस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest