Pune News : सुदानच्या विद्यार्थ्यांकडून वकिलाला मारहाण

सुदान (Sudan) देशातील दोन विदेशी नागरिकांनी एका वकीलासोबत वाद घालत याच्या डोक्यात काचेचा मग मारून गंभीर (Pune Crime News) जखमी केल्याची घटना जनवाडी येथील सोमेश्वर (Someshwar temple) मंदिराजवळ घडली. या प्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात (Chatushringi police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Mon, 30 Oct 2023
  • 01:15 pm
Pune News : सुदानच्या विद्यार्थ्यांकडून वकिलाला मारहाण

संग्रहित छायाचित्र

पुणे : सुदान (Sudan) देशातील दोन विदेशी नागरिकांनी एका वकीलासोबत वाद घालत याच्या डोक्यात काचेचा मग मारून गंभीर (Pune Crime News) जखमी केल्याची घटना जनवाडी येथील सोमेश्वर (Someshwar temple) मंदिराजवळ घडली. या प्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात (Chatushringi police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बखित हुसेन अहमद नागे (Bakhit Hussain Ahmad Nage) (वय २०) आणि रोडवान आडम (Rodwan Adam) (वय २०) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ऍड. निलेश भरत खोल्लम (वय ३३, रा. भरत कुंज, सोमेश्वर मंदिराजवळ, जनवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. बखित हुसेन आणि रोडवान आडम हे दोघेही सुदान येथील आहेत. ते एमआयटी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. निलेश खोल्लम यांच्या घरासमोर राहणाऱ्या आयुब पठाण यांचे हे भाडेकरू आहेत.

हे दोघेही घराच्या आवारात गप्पा मारत बसलेले होते. तसेच या ठिकाणी कोणते तरी पेय प्राशन करीत बसलेले होते. त्यावेळी खोल्लम यांनी त्यांना इंग्रजी भाषेत समजावून सांगितले आणि आपण येथे बसू नका. आपण राहत असलेल्या घराजवळ जाऊन बसा असे सांगितले. त्यावेळी त्यांना चुकून हात लागला. त्यावरून चिडलेल्या आरोपी यांनी शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली आणि त्यांच्या डोक्यात काचेचा मग मारून गंभीर जखमी केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कोळी करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest