संग्रहित छायाचित्र
कर्वेनगरमधील एका नामांकित शाळेतील नृत्यशिक्षकाने लहान मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात वारजे पोलिसांनी संस्थाचालकाला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
अन्वित सुधीर फाटक (वय ४०) (Anvit Sudhir Phatak) असे अटक झालेल्या संस्थाचालकाचे नाव आहे.
कर्वेनगरमधील एका नामांकित शाळेत नृत्यशिक्षकाने लहान मुलांवर व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर अश्लील कृत्य केले होते. तसेच अत्याचार करतानाचे रेकॉर्डिंग मोबाईलमध्ये करून ते इतर लोकांना पाठविण्याची धमकी दिली. हा सगळा प्रकार नोव्हेंबर पासून १४ डिसेंबर पर्यंत सुरु होता.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नृत्यशिक्षकाला अटक केली होती. तसेच निष्काळजीपणा दाखवल्यामुळे संस्थाचालक अन्वित फाटक याला देखील अटक करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.