Pune Crime : प्रवासी महिलेचे सव्वा लाखांचे दागिणे चोरीला

पीएमपी बसने प्रवास करणार्‍या महिलेच्या पर्समधील १ लाख २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरट्यांनी लंपास केले. (Pune Crime)

Pune Crime

संग्रहित छायाचित्र

पुणे : पीएमपी बसने प्रवास करणार्‍या महिलेच्या पर्समधील १ लाख २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे  चोरट्यांनी लंपास केले.  (Pune Crime) 

याप्रकरणी, गणेशनगर तडवळे येथील एका २५ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलिस (Swargate Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानक परिसरात घडली आहे. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने ही चोरी केली. फिर्यादी महिला हि पीएमपी बसने प्रवास करीत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पर्समधील दागिणे चोरी केले. अधिक तपास स्वारगेट पोलिस करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest