इंडिगो एअरलाईन्सच्या प्रवासी महिलेचा विनयभंग
पुणे : इंडिगो एअरलाइन्सच्या (Indigo Airlines) फ्लाईटमधून बेंगलोरला जाण्यासाठी बोर्डिंग पास चेकिंग झाल्यानंतर ट्युनल क्यू मध्ये असताना एका प्रवाशाने महिलेला अश्लील स्पर्श करीत (Pune Crime News) विनयभंग (molestation)केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस (Airport Police) ठाण्यात प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Police)
जीन्शान पी एल (Jinshan PL) (वय ४०) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी २७ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही घटना २१ ऑक्टोबर रोजी लोहगाव विमानतळावरील घडली. पीडित महिला पुणे लोहगाव विमानतळावरून इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाईट मधून बेंगलोरला जाणार होती. बोर्डिंग पास चेकिंग झाल्यानंतर ती ट्युनेल क्यू मधून विमानाकडे पायी चालत जात होती. त्यावेळी या तरुणीच्या पाठीमागे उभ्या असलेल्या आरोपीने त्यांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या पार्श्वभागाला अश्लील स्पर्श केले. तो त्यांना चिकटून उभा राहिला आणि शरीराला विविध ठिकाणी अश्लील स्पर्श करीत विनयभंग केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.