Pune Crime : पतीने पत्नीवर फेकले ऍसिड

कौटुंबिक वादातून वेगळ्या राहत असलेल्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केलेली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Thu, 2 Nov 2023
  • 09:14 am

पतीने पत्नीवर फेकले ऍसिड

पुणे : कौटुंबिक वादातून वेगळ्या राहत असलेल्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केलेली आहे. पत्नीने ही तक्रार मागे घ्यावी यासाठी पतीने तिच्या अंगावर ऍसिड टाकून मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना हडपसर मधील भेकराईनगर येथे असलेल्या मोरया हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

श्रीहरी बब्रुवान नरवटे (वय ३५, रा. खरोसा, लातूर) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी अनिता श्रीहरी नरवटे (वय ३१, रा. श्री गणेश प्लाझा, भेकराईनगर) यांनी फिर्यादी दिली आहे. श्रीहरी आणि अनिता हे दोघे पती-पत्नी आहेत. कौटुंबिक वादा मधून हे दोघेही मागील काही वर्षांपासून वेगळे राहतात. फिर्यादी अनिता या मोरया हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करतात. त्यांनी सासरच्या लोकांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केलेला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी आरोपी हॉस्पिटलमध्ये आला आणि त्याने तो 'आमच्यावरील केस मागे घेत नाहीस ना... थांब तुला दाखवतो' असे म्हणत तिच्या अंगावर ऍसिड टाकले. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest