अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पळून गेलेला आरोपी गजाआड
पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करीत सामूहिक बलात्कार (Pune Crime News) केल्याच्या प्रकरणामध्ये दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या वाहन चोरी दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले. त्याला ग्रामीण पोलीस दलाच्या हवेली पोलिसांच्या (Haweli Police) ताब्यात देण्यात आले आहे.
लक्ष्मण महादेव पाटील (Laxman Mahadev Patil) (वय २५, रा. डोणजे, ता. हवेली) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर २०२१ साली बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून पाटील फरार झालेला होता. हा आरोपी खजिना विहीर तालीम येथे येणार असल्याची कोंबिंग ऑपरेशन राबविताना पथकातील पोलीस अंमलदार महेश पाटील व सुमित ताकपेरे यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
गुन्हे शाखेच्या पोलिसानी हवेली पोलीस स्टेशन येथे संपर्क साधला. दाखल गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला हवेली पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे, सतीश गोवेकर, वरिष्ठ निरीक्षक अशोक इंदलकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख, पोलीस नाईक ढगे, सुमित ताकपेरे, पाटील यांनी केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.