हॉस्पिटल अपॉईंटमेंटच्या नावाखाली फसवणूक
पुणे : कोटबागी हॉस्पिटल मधून बोलत असल्याची बतावणी करीत रुग्णालयाची अपॉइंटमेंट घेऊन देण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाला लिंक पाठवून त्या आधारे ६५ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करून घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बलीजेपल्ली सेतूमाधवराव (वय ७९, रा. खगोल सोसायटी, पंचवटी, पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे. सेतूमाधवराव यांना आरोपीने फोन केला. तो कोटबागी हॉस्पिटलमधून बोलत असल्याची बतावणी केली. त्यांना जर हॉस्पिटलची अपॉइंटमेंट हवी असेल तर दहा रुपये ऑनलाईन लिंक द्वारे पाठविण्यास सांगितले. आरोपीने सांगितल्याप्रमाणे त्यांनी दहा रुपये ऑनलाईन पाठवले. त्यानंतर त्यांच्या बँकेचा सर्व डाटा आरोपीला प्राप्त झाला. त्या आधारे त्यांच्या खात्यातून ६४ हजार ६५३ रुपये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करून फसवणूक करण्यात आली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.