टेलिग्राम टास्कद्वारे फसवणूक, गुन्हा दाखल
पुणे : व्हाट्सअपवर मेसेज करून गुगल मॅपवरील (Pune Crime News) विविध ठिकाणांचे रिव्ह्यू टास्क पूर्ण केल्यास चांगले पैसे कमवण्याची संधी (Fraud) असल्याचे आदीसह दाखवत ५१ वर्षीय व्यक्तीला नऊ लाख ६० हजार रुपयांना (Pune Police) फसवण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात कोथरूड पोलीस (Kothrud Police) ठाण्यात फसवणूक आणि आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २ ऑगस्ट २०२३ ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधी दरम्यान ऑनलाईन घडला.
याप्रकरणी शैलेंद्र विनायक मुंगी (वय ५१, रा. सृष्टी सोसायटी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी मुंगी यांना ऑनलाईन संपर्क साधला. त्यांना गुगल मॅप वरील विविध ठिकाणांचे रिव्ह्यू टास्क पूर्ण करण्याचे काम असल्याचे सांगितले. व्हाट्सअप वर त्यांना मेसेज करून पैसे कमावण्याची ऑनलाइन संधी असल्याची बतावणी केली. त्यांना पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवत विविध बँक विविध लिंक पाठवून टेलिग्रामच्या माध्यमातून वेगवेगळे टास्क पूर्ण करण्याचे काम देण्यात आले.
पैसे मिळवण्यासाठी त्यांना विविध अकाउंटवर नऊ लाख ६० हजार रुपये ट्रान्सफर करायला लावून आर्थिक फसवणूक केली. मुंगी यांनी याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील करीत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.