संग्रहित छायाचित्र
पुणे : मुंबई येथील आर्मी स्कूल (Army School) मध्ये मुलीला ऍडमिशन मिळवून देतो असे सांगत ९१ हजार रुपये उकळून फसवणूक (Fraud) करण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ९ एप्रिल २०२२ ते १३ एप्रिल २०२२ या कालावधी दरम्यान घडला.
नवजीत सिंग असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी टीना सुरेश होटवाणी (वय ४३, रा. नरवीर तानाजी सोसायटी, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी नवजीत सिंग हा टिना यांचा मित्र आहे. त्याने टीना यांच्या मुलीचे मुंबईमधील आर्मी स्कूलमध्ये ऍडमिशन करून देतो असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. टीना यांच्या वडिलांच्या अकाउंट वरून त्या साठी गुगल पे द्वारे वेळोवेळी ९१ हजार रुपये उकळले. परंतु, ॲडमिशन मिळवून न देता आणि पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावरून फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.