चारित्र्याचा संशयातून मुलांच्या डीएनए टेस्टची मागणी
पुणे : पत्नीवर असलेल्या चारित्र्याच्या (Pune News) संशयावरून घरामध्ये भांडणे करीत मुलांची डीएनए टेस्ट (DNA Test) करून घ्यायची मागणी पतीने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात ( Alankar Police Station) कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
पती तानाजी कारंडे, सासू शारदा कारंडे, सासरे नवनाथ कारंडे, दीर धनाजी कारंडे (सर्व रा. काळेपडळ, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अश्विनी तानाजी कारंडे (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी आणि अश्विनी हे पती-पत्नी आहेत. लग्न झाल्यापासून आरोपी फिर्यादी महिलेला चारित्र्याच्या संशयावरून त्रास देत होते. त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ देखील केला जात होता. त्यांना वारंवार मारहाण करून त्रास दिला जात होता. दरम्यान, आरोपी पतीने त्यांची एक मुलगी आणि मुलगा ही आपली मुले नाहीतच असा दावा करून त्यांची डीएनए टेस्ट करून घेण्याची विचित्र मागणी केली आणि त्यांना मुलांसह घरातून हाकलून दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.