संग्रहित छायाचित्र
देहूरोड: विनापरवाना हॉटेलमध्ये दारू आणि हुक्का विक्री केली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (१ मार्च) दुपारी पावणे एक वाजताच्या सुमारास हॉटेल ग्लॅमर २४ किवळे येथे करण्यात आली. रविकुमार योगेश्वर दास (वय २८), दीपक ज्योतिबा पन्हाळकर (वय ३४), मनोज रामदुलारे चौधरी (वय २३, तिघे रा. ग्लॅमर हॉटेल २४, किवळे) अशी अटक केलेले आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस अंमलदार बाळासाहेब नंदुर्गे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pimpri Chinchwad Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे विनापरवाना दारू, हुक्काचे साहित्य आणि हुक्का फ्लेवर बाळगला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २९ हजार रुपये किमतीचे दारू, हुक्का साहित्य आणि हुक्का फ्लेवर जप्त केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.