Crime News: विमाननगरमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

पुणे : विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदा वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातून २५ ते ३० वयोगटातील

संग्रहित छायाचित्र

स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता बेकायदेशीर वेश्याव्यवसाय

पुणे : विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदा वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातून २५ ते ३० वयोगटातील चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

स्पा मालक सतीश सकनुरे (वय ३२, रा. लातूर) आणि स्पा मॅनेजर रोशनी सुरेश पाटील (वय ३४,रा. वाघोली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुधा चौधरी (वय ३४) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान नगर येथील ईस्ट कोर्ट बिल्डिंगमध्ये असलेल्या स्पा सेंटरमध्ये बेकायदा वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी छापा टाकण्यात आला. त्यावेळी आरोपी पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे निष्पन्न झाले. त्यातून मिळालेल्या रकमेवर स्वतःची उपजीविका ते करीत होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest