Crime News: बेरोजगारीची शोकांतिका; नोकरी नसल्याने फार्मसी केलेला तरुण वळला चोरीकडे

पुणे : सध्या बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. बेरोजगारीमुळे मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याची शोकांतिका असून त्याचेच एक उदाहरण समोर आले आहे. 'डी-फार्म' पर्यन्त शिक्षण घेतलेल्या तरुणाला नोकरी न मिळाल्याने

Pune police

आरोपी: आदित्य बाळासाहेब कवडे

उच्चशिक्षित चोरट्याला ग्रामीण पोलिसांकडून बेड्या

पुणे : सध्या बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. बेरोजगारीमुळे मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याची शोकांतिका असून त्याचेच एक उदाहरण समोर आले आहे. 'डी-फार्म' पर्यन्त शिक्षण घेतलेल्या तरुणाला नोकरी न मिळाल्याने तसेच तुटपुंज्या उत्पन्नात भागत नसल्याने चोरीचा मार्ग अवलंबावा लागला. पुणे आणि नगर जिल्ह्यात तब्बल बारा घरफोड्या करणाऱ्या या उच्च शिक्षित चोरट्याला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीमध्ये त्याच्या शिक्षण आणि परिस्थितीमुळे तो चोरीकडे वळल्याचे समोर आले. त्याच्याकडून घरफोडीचे बारा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून तीन लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. (Pune Crime News)

आदित्य बाळासाहेब कवडे (वय २१, रा. कोळगाव, श्रीगोंदा, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रात्रीच्या वेळी कामकाज संपल्यानंतर कुलूप बंद केलेल्या परमिट बार आणि हॉटेलच्या खिडक्या, दरवाजे उचकटून त्यामधून रोकड लंपास करण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. अशा प्रकारच्या  पाच घटना घडल्याचे निष्पन्न झाले होते. या घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती हातात कुऱ्हाड घेऊन चोरी करीत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळांना भेटी दिल्या.

तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सर्व घटनांमध्ये एकच व्यक्ती हातात कुऱ्हाड घेऊन चोरी करत असल्याचे निदर्शनास आले. हा आरोपी दौंड - काष्टी बाजूकडे जात असल्याचे प्रथमदर्शनी तपासात समोर आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काष्टी परिसरातील गोपनीय खबऱ्यांना सतर्क केले. खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आदित्य कवडे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने यवत, बारामती, श्रीगोंदा परिसरातील हॉटेलच्या खिडक्या आणि दरवाजे उचकटून चोरी केल्याचे तसेच मोटरसायकली देखील चोरल्याची कबुली दिली.  त्याच्याकडून यवत पोलीस ठाण्यातील पाच, बारामती तालुका पोलीस ठाण्यातील दोन, बारामती शहर पोलीस ठाण्यातील एक, दौंड येथील एक, श्रीगोंदा येथील दोन आणि हडपसर येथील एक असे १२  गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याचे गोयल यांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत शेडगे,  एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संघपाल, पोलीस कर्मचारी अमित सिद्पाटील, रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, सचिन घाडगे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे आसीफ शेख, अजित भुजबळ, निलेश शिंदे, राजू मोमीन, अतुल ढेरे यांनी केली.

आदित्य कवडे हा उच्च शिक्षित आहे. त्याचे 'डी-फार्म'पर्यन्तचे शिक्षण झाले आहे. त्याला नोकरी मिळत नव्हती. त्याने नोकरी पत्करली; परंतु, त्या तुटपुंज्या उत्पन्नात घरचे भागत नव्हते. त्याचे वडील देखील एका ठिकाणी खासगी नोकरी करतात. तर, आई गृहीणी आहे. दैनंदिन कौटुंबिक गरजा आणि उत्पन्न यांचा मेळ बसत नसल्याने  त्याने चोरीचा मार्ग निवडला. त्याने अवघ्या काही महिन्यात आतापर्यंत बारा घरफोड्या केल्या आहेत. त्याच्यावर यापूर्वीचे कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचे आढळून आले नव्हते. तो पहिल्यांदाच पोलिसांच्या रेकॉर्डवर आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest