Crime News: किरकोळ वादातून तरूणावर वार

पुणे : किरकोळ वादामधून तरूणावर कोयत्याने वार करून पसार झालेल्या आरोपींना पर्वती पोलिसांनी (Parvati Police) अटक केली आहे. या आरोपींनी १ जानेवारी रोजी पानमळा

संग्रहित छायाचित्र

पर्वती पोलिसांकडून आरोपींना अटक

पुणे : किरकोळ वादामधून तरूणावर कोयत्याने वार करून पसार झालेल्या आरोपींना पर्वती पोलिसांनी (Parvati Police) अटक केली आहे. या आरोपींनी १ जानेवारी रोजी पानमळा वसाहतीमध्ये घडला. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune Crime News)

हर्षद ऊर्फ सोन्या शंकर खुळे (वय २०, रा. दत्तवाडी पोलीस चौकी मागे, दत्तवाडी), तुषार भरत कदम (वय २३, रा. हनुमान नगर, दत्तवाडी), आदित्य शंकर चव्हाण (वय १८, रा. जुना दत्तवाडी रोड, दत्तवाडी), पियुश श्रीकांत गायकवाड (वय २३, रा. हनुमान नगर, दत्तवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. हर्षद ऊर्फ सोन्या हा पर्वती, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. या आरोपींनी १ जानेवारी रोजी अजुन कोठे गुन्हे केले आहेत का या बाबत चौकशी सुरु आहे. याप्रकरणी किरण बाळू निमसे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी निमसे आणि त्यांचे मित्र सार्वजनिक रस्त्यावर गप्पा मारत उभे होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी निमसे यांच्या मित्रांसोबत भांडणे सुरू केली. याबाबत त्यांची आरोपींकडे विचारणा केली. त्यांना धक्काबुक्की करीत मारहाण करण्यास आरोपींनी सुरुवात केली. 'आमच्या भांडणामध्ये येतो काय? थांब तुला आत्ता खलास करतो' असे म्हणत त्यांच्या हातातील कोयत्याने फिर्यादीवर वार केला. हा वार त्यांनी हाताने कोयता धरत अडवला. त्यावेळी आदित्य चव्हाण याने त्याच्याकडील कोयत्याने निमसे यांच्या डोक्यात, पाठीवर, हातावर, छातीवर वार केले.

घटनास्थळावरून आरोपी पसार झाले. याबाबत पोलीस ठाण्याला माहिती कळवण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपास पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी दत्तवाडीतील म्हात्रे पुलाखाली येणार असल्याची माहिती  पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला, अमित सुर्वे, कुंदन शिंदे यांना खबऱ्यामार्फत मिळाली. याठिकाणी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.  ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, पोलीस नाईक अमित सुर्वे, पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला, दया तेलंगे पाटील, अनिस तांबोळी, सुर्या जाधव, सद्दाम शेख, अमोल दबडे, व अमित चिव्हे यांनी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest